वडणगेकरांचाही हद्दवाढीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:17+5:302021-02-06T04:42:17+5:30

वडणगे : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला वडणगेकरांनीही विरोध दर्शविला आहे. हद्दवाढीमुळे आमची सुपीक शेती नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करीत ...

Wadangekar also opposes boundary extension | वडणगेकरांचाही हद्दवाढीला विरोध

वडणगेकरांचाही हद्दवाढीला विरोध

Next

वडणगे : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला वडणगेकरांनीही विरोध दर्शविला आहे. हद्दवाढीमुळे आमची सुपीक शेती नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करीत वडणगे ग्रामपंचायतीने हद्दवाढ न करता वडणगे गावास क वर्ग नगरपरिषदेस मंजुरी द्यावी, अशी मागणी वडणगे ग्रामपंचायतीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, वडणगे हे शेतीप्रधान गाव असून, त्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची वडणगेपर्यंत हद्दवाढ झाल्यास येथील ग्रामीण जीवन उद्ध्वस्त होऊन अनेक लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. वडणगे व कोल्हापूरला जोडणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर पावसाळ्यात महापुराचे पाणी असते. शहराशी संपर्क सतत तुटतो. त्यामुळे वडणगे गाव कोल्हापूर शहराशी भौगोलिक संलग्न होऊ शकत नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीत वडणगे गावचा समावेश न करता वडणगेस स्वतंत्र ‘क’ वर्ग दर्जाच्या नगरपरिषदेस मान्यता द्यावी. यावेळी सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, पं. स. सदस्य इंद्रजित पाटील, सरदार मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य माणिक जाधव, उत्तम साखळकर, सयाजीराव घोरपडे, सुनील पोवार, भगवान पोतदार, अर्जुन चौगले, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो: ०४ वडणगे निवेदन

ओळी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत वडणगे गावाचा समावेश करू नका, अशी मागणी वडणगेचे सरपंच सचिन चौगले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी उपसरपंच सतीश पाटील, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, सयाजी घोरपडे, सरदार मिसाळ, भगवान पोतदार, उत्तम साखळकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Wadangekar also opposes boundary extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.