वडणगेची महाशिवरात्री यात्रा भाविकांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:42+5:302021-03-13T04:42:42+5:30

येथील महाशिवरात्री यात्रेला दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गावच्या इतिहासात प्रथमच यात्रा भाविकाविना झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील महाशिवरात्री यात्राही ...

Wadange's Mahashivaratri Yatra without devotees | वडणगेची महाशिवरात्री यात्रा भाविकांविना

वडणगेची महाशिवरात्री यात्रा भाविकांविना

Next

येथील महाशिवरात्री यात्रेला दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गावच्या इतिहासात प्रथमच यात्रा भाविकाविना झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील महाशिवरात्री यात्राही रद्द करण्यात आल्याने मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. यात्रा भरली नसल्याने लाखो रुपयांची उलाढालही ठप्प झाली.

शंकर व पार्वतीचे दोन स्वतंत्र मंदिरे वडणगेत आहेत. येथील महाशिवरात्री यात्रेला दरवर्षी भाविक दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावतात. मंदिर परिसर, तसेच येथील यात्रेचा मुख्य मार्ग यात्रेकरूंनी गजबजलेला असतो. खेळणी, विविध वस्तू विक्रीचे स्टॉल, खाद्यपदार्थांच्या गाड्या, लहान मुलांसाठी पाळणे यांची यात्रेत मोठी गर्दी असते. यावर्षी यात्रा रद्द झाल्याने यात्रेचा उत्साह दिसून येत नव्हता.

मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते. त्यामुळे बाहेरील व्यक्तींना मंदिर परिसरात प्रवेश नव्हता. गुरुवारी पहाटे महादेव व पार्वती मंदिरात सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य व श्रीपूजक गुरव बंधू या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळून अभिषेक घालून धार्मिक विधी करण्यात आले.

फोटो : ११ वडणगे महाशिवरात्री

ओळी:- वडणगे (ता. करवीर) येथील महाशिवरात्री यात्रेचा प्रमुख मार्ग दुपारी निर्मनुष्य होता.

Web Title: Wadange's Mahashivaratri Yatra without devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.