वडगावच्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३४ खटले निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:28+5:302021-09-27T04:25:28+5:30

यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जे. एस. गायकवाड, सहदिवाणी न्यायाधीश सी. एस. देशपांडे, ...

In the Wadgaon court, 434 cases were disposed of in the National Lok Adalat | वडगावच्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३४ खटले निकाली

वडगावच्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३४ खटले निकाली

Next

यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जे. एस. गायकवाड, सहदिवाणी न्यायाधीश सी. एस. देशपांडे, प्रियांका राजपूत, अश्विनी सोळांकुरे, जे. बी. पाटील, ए. एन. पाटील, परशुराम गवळी, सचिन डफळे, संजय गुरव यांनी काम पाहिले. प्रलंबित कामापैकी ३९२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी या न्यायालयात १४७ प्रकरणे सामोपचाराने निकाली करून रक्कम रुपये ७५ लाख ३३ हजार ५५९ रुपये त्याचबरोबर २३५२ दाखलपूर्व कामे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २८७ प्रकरणे सामोपचाराने तडजोड करण्यात आली. ३९ लाख १० हजार २१६ रुपये एवढ्या रकमेची तडजोड व वसुली करण्यात आली. यावेळी पक्षकार, बँक प्रतिनिधी,सहायक अधीक्षक एन. एन. सावंत, एस. एस. दिवाण, सुरेश भोपळे उपस्थित होते.

Web Title: In the Wadgaon court, 434 cases were disposed of in the National Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.