वडगाव पालिकेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:25 AM2021-05-08T04:25:03+5:302021-05-08T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा प्रश्न अखेरीस निकाली निघाला असून, येथे जत पालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा प्रश्न अखेरीस निकाली निघाला असून, येथे जत पालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी कारभाराची सूत्रे हाती घेतली. कोरोनाच्या काळात वडगावला मुख्याधिकारी मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्यानंतर मुख्याधिकारी न देताच प्रभारीवर वडगाव पालिकेचा भार देण्यात आला होता. पालिकेला सक्षम अधिकारी नसल्याने पालिका प्रशासनात विस्कळीतपणा आला. शहरातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढली झाली. धोरणात्मक निर्णय, उपाययोजना करता येईना. अशी परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर अखेरीस देसाई हजर झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथील रहिवासी असणारे देसाई यांनी २००६ ला वसई, विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त, उपायुक्तपदही काम केले आहे. त्यानंतर तासगाव, कामठी, अक्कलकोट, जत आदी ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्याच बरोबर सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील
पालिकेचे प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
०७ मनोजकुमार देसाई