वडगाव पालिकेचा ४६ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:37+5:302021-02-27T04:32:37+5:30

पेठवडगाव : वडगाव पालिकेच्या ४६ कोटींच्या अर्थसंकल्पास एकमताने मंजुरी देण्यात आली. छत्रपती शिवाजी चौक सुशोभिकरणासाठी आमदार फंडातून २५ ...

Wadgaon Municipal Corporation's budget of 46 crores | वडगाव पालिकेचा ४६ कोटींचा अर्थसंकल्प

वडगाव पालिकेचा ४६ कोटींचा अर्थसंकल्प

Next

पेठवडगाव : वडगाव पालिकेच्या ४६ कोटींच्या अर्थसंकल्पास एकमताने मंजुरी देण्यात आली. छत्रपती शिवाजी चौक सुशोभिकरणासाठी आमदार फंडातून २५ लाख, सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक सुशोभिकरण, सुधारित शहर आराखडा व पालिका इमारत व व्यापारी संकुल, सर्व रस्त्यांचे डांबरीकरण आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

महालक्ष्मी मंगलधाम येथे झालेल्या सभेत विषय पत्रिकेवरील तब्बल २९, तर आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करून निर्णय झाले. दरम्यान, नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी सभागृहात केडरच्या कर्मचाऱ्यांचे वाभाडे काढले. कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे, असे जमत नसेल, तर बदली करून घ्या, अन्यथा कारवाई करू, असा सज्जड दम भरला.

अर्थसंकल्पाचे वाचन नगराध्यक्ष माळी यांनी, तर विषयपत्रिकेचे वाचन सुरेश भोपळे यांनी केले.

मराठी शाळेची जागा ही पालिकेची आहे; तर बळवंतराव यादव हॉस्पिटलची जागा जिल्हा परिषदेची आहे. ही जागा एकमेकांना हस्तांतरण करण्याच्या विषयावर चर्चा झाली. जोपर्यंत आदेश होत नाही, तोपर्यंत शाळेचे काम थांबवावे, अशी मागणी अजय थोरात यांनी केली. शहरातील बेकायदेशीर नळ पाणी कनेक्शनवरही चर्चा झाली.

भाजी मंडईतील दुकान गाळ्यावरून गुरूप्रसाद यादव यांनी प्रश्न उपस्थित केला. अजय थोरात यांनी गाळेधारकांची भाडेवाढ होत नसल्याने पालिकेचे नुकसान झाल्याचा आरोप केला, तर शहर विकासात काही अपप्रवृत्ती तयार होत आहे. गाळेधारकांना वेठीस धरू नका, असे आवाहन नगराध्यक्ष माळी यांनी केले.

चौकट - ४६ कोटींचा अर्थसंकल्प

कोणतीही करवाढ न करता वडगाव नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत २०२०-२१ च्या सुधारित, तर यावर्षीच्या ५ कोटी ४७ लाख रुपये शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. सभेत २०२१-२२ च्या एकूण ४५ कोटी ५१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. यामध्ये गतवर्षीच्या विकासकामासाठी पुढे तरतुदी केल्या आहेत.

चौकट - यावर झाल्या तरतुदी

छत्रपती शिवाजी पुतळा चौक सुशोभिकरण, सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकांचे नूतनीकरण, विकास आराखडा, पालिका इमारत व व्यापारी संकुल, रमाई व पंतप्रधान घरकुल रस्त्यांचे डांबरीकरण, मुख्याधिकारी वाहन मिनी अग्निशमन, शववाहिका आदींसाठी २६ कोटी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Wadgaon Municipal Corporation's budget of 46 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.