लालबावट्याकडून मजुरीवाढीचा तक्ता जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:23 AM2021-01-08T05:23:44+5:302021-01-08T05:23:44+5:30
इचलकरंजी : येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून जाहीर केलेल्या ५२ पिकाला ८ पैसे मजुरीवाढीप्रमाणे पुढील पिकानुसार होणाऱ्या एकूण मजुरीवाढीचा ...
इचलकरंजी : येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून जाहीर केलेल्या ५२ पिकाला ८ पैसे मजुरीवाढीप्रमाणे पुढील पिकानुसार होणाऱ्या एकूण मजुरीवाढीचा तक्ता लालबावटा जनरल कामगार युनियनने गुरुवारी जाहीर केला. सन २०१३ च्या करारानुसार अन्य आठ नियमांचेही पालन करावे, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकात केले आहे. सन २०२१ वर्षासाठी प्रशासनाच्यावतीने ५२ पीक प्रतिमीटर कापडास ८ पैसे मजुरीवाढ घोषित केली आहे. त्यानुसार सर्वप्रकारच्या धोतीसाठी ५१ इंच पन्याच्यापुढे प्रतिमीटर २ पैसे वाढ, प्लेन क्वॉलिटीसाठी ५१ पन्याच्यापुढे १.५ पैसे प्रतिमीटर वाढ (पीव्हीसी, पीसी कॉटन, धोतीवगळून), कार्बन पॉलिस्टर धोती प्रतिमीटर २० पैसे वाढ, सिफॉन, सूरत धोती प्रतिमीटर २५ पैसे वाढ, कॉटन धोती १० पैसे प्रतिमीटर वाढ, प्लेन क्वॉलिटी (पीव्ही, पीसी) प्रतिमीटर १२ पैसे वाढ, दिवाळी-बोनस १६.६६ टक्के व साप्ताहिक सुटी, आदी नियमांचे करारानुसार सर्व यंत्रमाग व्यावसायिकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.