‘वन्यजीव’च्या ‘एनओसी’ची प्रतीक्षा

By Admin | Published: December 30, 2014 11:51 PM2014-12-30T23:51:31+5:302014-12-31T00:11:17+5:30

काम ‘जैसे थे’च : शिवडाव-सोनवडे घाटरस्ता

Waiting for 'NGO' for 'Wildlife' | ‘वन्यजीव’च्या ‘एनओसी’ची प्रतीक्षा

‘वन्यजीव’च्या ‘एनओसी’ची प्रतीक्षा

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग असलेल्या शिवडाव-सोनवडे घाटरस्त्याचे काम सुरू होण्यासाठी वन्यजीव विभागाकडून ‘एनओसी’ची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप ‘एनओसी’ न मिळाल्याने काम अद्याप ‘जैसे थे’ आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १७ डिसेंबरला विधानभवन, नागपूर येथे वनविभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतरही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नव्या वर्षात तरी घाटरस्त्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
कोल्हापूर व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे जोडणाऱ्या शिवडाव घाटरस्त्याचे काम २००८-२००९ पासून वन व वन्यजीव संरक्षण खात्याची परवानगी न मिळाल्यामुळे रखडले. या घाटासाठी आवश्यक असणारी पर्यायी जमीन २००८ मध्ये वनविभागास नांदेड जिल्ह्यातील दहिकळंब (ता. कंधार) येथील १० हेक्टर व लिनगव्हाण (ता. नायगाव) येथील १० हेक्टर अशी एकूण २० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यातील ९.२२ हेक्टर देण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर हा रस्ता करण्यास वनविभागाने परवानगी दिली.
दरम्यान, या रस्त्याची आखणी ही राधानगरी वन्यजीव उद्यान सीमेपासून १० किलोमीटरच्या आत असल्याने यासाठी वनसंरक्षक, वन्यजीव विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही परवानगी नसल्यामुळे घाटाचे अद्याप काम सुरू झालेले नाही. घाटरस्ता मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तसेच वेळोवेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
या रस्त्याचे रखडलेले काम सुरू व्हावे, यासाठी मंत्री पाटील विशेष प्रयत्न करत आहेत. बैठकीनंतर दहा दिवसांत ‘वन्यजीव’विभागाकडे ‘एनओसी’साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठविला आहे पण अजूनही ‘एनओसी’ मिळालेली नाही.

Web Title: Waiting for 'NGO' for 'Wildlife'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.