शिरोळ पोलीस ठाण्याला अधिकाऱ्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:47+5:302021-07-22T04:15:47+5:30
शिरोळ : शासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. यामध्ये पोलीस प्रशासनातील बदल्याबाबत उत्सुकता आहे. शिरोळ ...
शिरोळ : शासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. यामध्ये पोलीस प्रशासनातील बदल्याबाबत उत्सुकता आहे. शिरोळ पोलीस ठाण्याकडे गेल्या दीड वर्षापासून पोलीस निरीक्षक पद रिक्त आहे. त्यामुळे येथील पोलीस ठाण्याला पदाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
शिरोळ पोलीस ठाण्याकडे पंधरा गावांचा समावेश आहे. सध्या या पोलीस ठाण्यात दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पोलीस ठाण्याचा कारभार आहे. जिल्ह्यात संवेदनशील असणाऱ्या या शहरात नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे जनतेबरोबर कायद्याची सांगड घालून काम करणारा अनुभवी निरीक्षक दर्जाचा अधिकारी असावा, या हेतूने पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याची या पोलीस ठाण्याकडे नियुक्ती केली जाते; मात्र गेल्या दीड वर्षापासून निरीक्षक पद रिक्त आहे. सध्या शासकीय पातळीवर सर्वच विभागाला बदल्यांचे वेध लागले आहेत. पोलीस प्रशासनातील बदल्या देखील तितकाच उत्सुकतेचा विषय आहे.