कोल्हापूरला लसीची प्रतीक्षाच, शहरात २०७ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:16+5:302021-05-20T04:26:16+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रे कोव्हिशिल्ड लस उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या पाच - सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आली ...
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रे कोव्हिशिल्ड लस उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या पाच - सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. लस कधी येणार याची नागरिक त्या त्या केंद्रावर जाऊन चौकशी करताना दिसत आहेत. परंतु, केंद्रातील कर्मचाऱ्यांकडूनही याबाबतची नेमकी माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिक व कर्मचारीच लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
शहरात बुधवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात २०७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे २२, फिरंगाई येथे ११, राजारामपुरी येथे १४, पंचगंगा येथे १०, महाडिक मळा येथे १४ व आयसोलेशन येथे १३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आज, गुरुवारी ४५ वर्षांवरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस दिला जाणार आहे.ज्यांना केंद्रावरून कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी फोन येईल, त्यांनीच फक्त संबंधित लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.