वाकरेचे अविनाश पाटील होणार करवीरचे उपसभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:46+5:302021-03-13T04:42:46+5:30

कसबा बावडा : करवीर पंचायत समिती उपसभापती पदाची आज, शुक्रवारी दि. १२ मार्च रोजी निवड होणार आहे. ...

Wakare's Avinash Patil will be Karveer's deputy speaker | वाकरेचे अविनाश पाटील होणार करवीरचे उपसभापती

वाकरेचे अविनाश पाटील होणार करवीरचे उपसभापती

Next

कसबा बावडा : करवीर पंचायत समिती उपसभापती पदाची आज, शुक्रवारी दि. १२ मार्च रोजी निवड होणार आहे. उपसभापती सुनील पोवार यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. वाकरेच्या अविनाश कृष्णात पाटील यांना उपसभापती पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

उपसभापती पोवार यांना नेत्यांनी सव्वा वर्षाचा कार्यकाल ठरवून दिला होता. हा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याने सुनील पोवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांच्याकडे दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते.

पंचायतीचे सभापतीपद पालकमंत्री सतेज पाटील गटाकडे आहे, तर उपसभापतीपद आमदार पी. एन. पाटील गटाकडे गेले आहे. या गटाचे असलेले अविनाश पाटील, अर्चना खाडे, सविता पाटील, नेताजी पाटील हे चौघे या स्पर्धेत आहेत. या चौघांपैकी एकास उपसभापती पदाची संधी मिळणार आहे. उपसभापती पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात घालायची, याचा निर्णय आमदार पी. एन. पाटील आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जाहीर करणार आहेत. मात्र वाकरेच्या अविनाश पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे समजते.

Web Title: Wakare's Avinash Patil will be Karveer's deputy speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.