जुन्या शिवाजी पूलावर ‘वॉकींग म्युझीयम’ साकारु - : पर्यटक वाढीसाठी लाईट अँड साऊंड शो, नौका विहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 06:01 PM2019-07-06T18:01:22+5:302019-07-06T18:03:59+5:30
शहरातील जुना शिवाजी पूल हा फक्त हेरिटेज म्हणून न राहता त्याला पर्यटनाची जोड देण्यासाठी ‘वॉकींग म्युझीयम’ करण्यात येणार आहे. ‘लाईट अँड साऊंड शो’ द्वारे कोल्हापूरचा इतिहास पूलावर दाखविला जाणार
कोल्हापूर : शहरातील जुना शिवाजी पूल हा फक्त हेरिटेज म्हणून न राहता त्याला पर्यटनाची जोड देण्यासाठी ‘वॉकींग म्युझीयम’ करण्यात येणार आहे. ‘लाईट अँड साऊंड शो’ द्वारे कोल्हापूरचा इतिहास पूलावर दाखविला जाणार असल्याची कल्पना लवकरच साकारण्यात येईल. कोल्हापूरच्या हेरिटेज वास्तू जतनसाठी जाहिर केलेल्या १ कोटी खासदार निधीपैकी काही निधी पूल सुशोभिकरणाकडे वळविण्यात येणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
पर्यायी शिवाजी पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर जुना पुल वाहतुकीस बंद केला आहे. पण हा पूल फक्त हेरिटेज म्हणून न राहता पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनावे याबाबत विवीध कल्पना साकारण्यासाठी शनिवारी दुपारी खासदार संभाजीराजे यांनी पूलास भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर आदी उपस्थित होते.