कोरोना काळात माणुसकीची भिंत उभारणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:17 AM2021-06-28T04:17:47+5:302021-06-28T04:17:47+5:30

पाडळी खुर्द येथील कै. भगवानराव पाटील ट्रस्टच्यावतीने कुडित्रे व चिंचवडे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केंद्रांना ...

The wall of humanity needed to be erected during the Corona period | कोरोना काळात माणुसकीची भिंत उभारणे गरजेचे

कोरोना काळात माणुसकीची भिंत उभारणे गरजेचे

Next

पाडळी खुर्द येथील कै. भगवानराव पाटील ट्रस्टच्यावतीने कुडित्रे व चिंचवडे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केंद्रांना औषधे व साहित्य देण्यात आले. यावेळी सरपंच जोत्स्ना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सरपंच ज्योत्स्ना पाटील म्हणाल्या की, डॉ. के.एन. पाटील यांनी केलेली मदत गरीब व गरजू कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करणारे आहे.

यावेळी उपसरपंच राजाराम कदम, बाजार समिती माजी सभापती पै.संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, तुकाराम शेलार, उर्मिला पाटील, सुवर्णा भास्कर, युवराज पाटील, के.एम. किरूळकर उपस्थित होते. ग्रामसेवक सरदार दिंडे यांनी आभार मानले.

फोटो -

कुडित्रे, ता. करवीर येथे कोविड केंद्राला औषध पुरवठा करताना डॉ. के. एन. पाटील, सरपंच ज्योत्स्ना पाटील, उपसरपंच राजाराम कदम, पै आकाराम पाटील व इतर.

Web Title: The wall of humanity needed to be erected during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.