जुन्या इमारतीची भिंत कोसळली, महाद्वार रोडवरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 07:04 PM2021-07-14T19:04:33+5:302021-07-14T19:06:57+5:30
Muncipalty Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या यादीत अतिधोकादायक इमारत म्हणून नोंद असलेल्या महाद्वार रोडवरील एका जुन्या इमारतीची भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. सुदैवाने भिंत कोसळत असताना आरडाओरड झाल्यामुळे दोन व्यक्तींनी पळ काढल्याने कोणीही जखमी झाले नाही.
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या यादीत अतिधोकादायक इमारत म्हणून नोंद असलेल्या महाद्वार रोडवरील एका जुन्या इमारतीची भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. सुदैवाने भिंत कोसळत असताना आरडाओरड झाल्यामुळे दोन व्यक्तींनी पळ काढल्याने कोणीही जखमी झाले नाही.
महानगरपालिकेने संबंधित इमारत मालकास नोटीस बजावून धोकादायक भाग उतरवून घेण्यास सांगितले होते. तसेच पोलिसांनाही कळविले होते. परंतु कुळाने न्यायालयात धाव घेतल्यामुळे इमारत उतरण्यास अडचणी आल्या होत्या. मंगळवारी दुपारी चारनंतर सर्व दुकाने बंद झाल्यानंतर मूळ मालक धोकादायक भाग उतरून घेत असताना अचानक पंधरा फूट उंचीवरून एका भिंतीचा भाग कोसळला.
ही घटना घडली तेव्हा इमारतीलगत रस्त्यावर दोन व्यक्ती थांबलेल्या होत्या, परंतु आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड करताच त्यांनी तेथून पळ काढला आणि क्षणात भिंत कोसळली. त्यामुळे सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र, मूळ मालक इमारत उतरून घेत असताना निष्काळजी दाखविली हे या घटनेवरून स्पष्ट झाले.