प्रभाग, आरक्षणावर आजपासून हरकती स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:47+5:302020-12-23T04:20:47+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचना तसेच प्रभाग आरक्षणावर हरकती, सूचना आज, बुधवारपासून ताराराणी ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचना तसेच प्रभाग आरक्षणावर हरकती, सूचना आज, बुधवारपासून ताराराणी उद्यानातील निवडणूक कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. दि. ४ जानेवारी २०२१ पर्यंत या हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
दि. ४ जानेवारीपर्यंत जेवढ्या सूचना व हरकती येतील, त्यांवर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होणार आहे. सुनावणीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही. आयोगाकडून ती कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भातील नोटिफिकेशन आज, बुधवारी जाहीर होत आहे.
कदम यांच्या प्रभागात बदल
प्रभाग क्रमांक ८, भोसलेवाडी-कदमवाडी व प्रभाग क्रमांक ९, कदमवाडी या प्रभागांत बदल करण्यात आले आहेत. पुढील बदल मात्र सांगण्यात आले नाहीत.