पोषण आहार पुरवणारे गोदाम सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:25+5:302021-08-12T04:29:25+5:30
कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतून जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्यासह कार्यकर्ते उचगाव येथील कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाकडे ...
कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतून जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्यासह कार्यकर्ते उचगाव येथील कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाकडे गेले. या ठिकाणी धान्याचा दर्जा खराब असल्याचे दिसून आले. मनमानी पद्धतीने पॅकिंग केले जात होते. धान्याची सरमिसळ केली जात होती. येथील अवस्था पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला फोन केला. सहाय्यक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी जागेवर येऊन पाहणी केली आणि गोदाम सील केले.
या गाेदामाची तपासणी करून विविध अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत. याबाबतचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र शिंगाडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे. तपासणीवेळी ज्या त्रुटी आढळल्या त्यानुसार येथील रिपॅकिंग आणि वितरण थांबविण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
हे गोदाम सील केल्याने आता जिल्ह्यातील शालेय पोषण आहार पुरवठा बंद होणार आहे तेव्हा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून दुसरीकडून हा पुरवठा सुरू ठेवावा आणि यावर उपाय काढावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केली आहे.