वारकरी कलावंतांना त्वरित मदत द्यावी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:53+5:302021-09-07T04:30:53+5:30

महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोल्हापूर शहर, तसेच सर्व तालुक्यातील धार्मिक उपक्रम, ...

Warkari artists should be given immediate help: Statement to District Collector | वारकरी कलावंतांना त्वरित मदत द्यावी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वारकरी कलावंतांना त्वरित मदत द्यावी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next

महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोल्हापूर शहर, तसेच सर्व तालुक्यातील धार्मिक उपक्रम, अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा आदी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे बंद आहेत. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, वारकरी सांप्रदायाचे बंडा महाराज यादव, लाला महाराज शिंगे, पांडुरंग पोवार, रामचंद्र जाधव, पाटील महाराज, यशवंत माने, सागर हिरवे, वायदंड महाराज, प्रताप साळोखे उपस्थित होते.

फोटो क्रमांक - ०६०९२०२१-कोल-वारकरी

ओळ - महाराष्ट राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Warkari artists should be given immediate help: Statement to District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.