रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल

By admin | Published: October 31, 2014 11:50 PM2014-10-31T23:50:32+5:302014-10-31T23:51:01+5:30

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना

Warkar's place due to lack of trains | रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल

रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल

Next

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना यावर्षी पंढरपूरसाठी जादा रेल्वे सोडण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने मिरजेतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सकाळी व सायंकाळी तीनच रेल्वेगाड्या आहेत.
आषाढी कार्तिकी वारीसाह दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मिरजेतून पंढरपूरला जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी सहा वाजता रात्री साडेआठ वाजता अशा तीनच रेल्वेगाड्या आहेत. सोमवार व शुक्रवारी दुपारी कोल्हापूर गोंदिया एक्स्प्रेस आहे. दररोज सकाळी सहापासून सायंकाळी सहापर्यंत बारा तासात पंढरपूरला जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी नाही.
आषाढी-कार्तिक वारीला कर्नाटक व कोकणातून येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. मात्र यावर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने वारकऱ्यांची अडचण झाली आहे. सायंकाळी व रात्री सुटणाऱ्या पॅसेंजरला वारकऱ्यांची खचाखच गर्दी आहे. रेल्वेत पाय ठेवायला जागा नसल्याने वृध्द, महिला व बालकांचे हाल सुरू आहेत. जादा रेल्वेपासून मोठे उत्पन्न मिळत असतानाही रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याच्या कारणावरून पंढरपूरसाठी जादा रेल्वे न सोडण्याचा अव्यवहार्य निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)

Web Title: Warkar's place due to lack of trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.