एफआरपी थकबाकीपोटी वारणाच्या साखर जप्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:49 AM2020-10-06T10:49:54+5:302020-10-06T10:52:25+5:30
Sugar factory, kolhapur news वारणा साखर कारखान्याने गत हंगामातील ३८ कोटी ७६ लाख रुपयांची एफआरपी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. या थकबाकीपोटी सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याकडील साखर, मोलॅसिससह इतर उत्पादनांची जप्ती करून त्यातून शेतकऱ्यांचे पैसे १५ टक्के व्याजासह द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याने गत हंगामातील ३८ कोटी ७६ लाख रुपयांची एफआरपी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. या थकबाकीपोटी सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याकडील साखर, मोलॅसिससह इतर उत्पादनांची जप्ती करून त्यातून शेतकऱ्यांचे पैसे १५ टक्के व्याजासह द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जय शिवराय शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चे काढून पैशांची मागणी केली होती तरीही कारखान्याने दखल न घेतल्याने सोमवारी संघटनेने थेट साखर आयुक्त गायकवाड यांच्यासमोर ठिय्या मारला.
आयुक्त गायकवाड यांनी जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस, आदी उत्पादनांची विक्री करावी. कारखान्याच्या जंगम, स्थावर मालमत्तेच्या दस्तऐवजांत शासनाच्या नावाची नोंद करावी, असे आदेश दिले.