घरकुल अनुदान घोटाळाप्रश्नी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:58+5:302021-04-20T04:23:58+5:30

शिरोळ : महापूर अनुदान वाटपात घोटाळा करणाऱ्या तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. शिवाय, लाभार्थ्यांकडून वसुलीत दिरंगाई झाल्याच्या ...

Warning of housing grant scam agitation | घरकुल अनुदान घोटाळाप्रश्नी आंदोलनाचा इशारा

घरकुल अनुदान घोटाळाप्रश्नी आंदोलनाचा इशारा

Next

शिरोळ : महापूर अनुदान वाटपात घोटाळा करणाऱ्या तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. शिवाय, लाभार्थ्यांकडून वसुलीत दिरंगाई झाल्याच्या विरोधात १ मे रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असे आंदोलन अंकुशच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २०१९ च्या महापुरात अनुदान वाटप करताना ४ कोटी रुपयांपेक्षा जादा रकमेचा घोटाळा चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालाद्वारे समोर आणला होता. तरीही त्यामध्ये हस्तक्षेप असलेले तलाठी व मंडळ अधिकारी यांना गेल्या एक वर्षापासून कारवाईविना वाचविण्याचा प्रकार सुरू आहे.

तसेच उच्च न्यायालयाने तहसीलदार यांनी सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे आदेश दिले असतानाही यामध्ये दिरंगाई होत आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई न करणे व शासकीय पैशाच्या वसुलीस टाळाटाळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोटी कागदपत्रे व खोटे पंचनामे करून शासनाचे अनुदान लाटणाऱ्या यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Warning of housing grant scam agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.