शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाचा आत्मदहनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:36 PM2022-01-31T12:36:32+5:302022-01-31T12:40:19+5:30

विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा सध्या तापला

Warning of self immolation from a senior professor at Shivaji University | शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाचा आत्मदहनाचा इशारा

शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाचा आत्मदहनाचा इशारा

googlenewsNext

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा सध्या तापला आहे. या विभागातील दोन प्राध्यापकांनी आपली विभागप्रमुखपदी नियुक्ती व्हावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यातील वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी आत्मदहनाचा इशारा रविवारी दिला आहे.

रसायनशास्त्र अधिविभागप्रमुखपदावर सध्या कार्यरत असणारे प्रा. जी. एस. गोकावी आज, सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत. विद्यापीठाच्या प्रचलित पद्धती आणि रसायनशास्त्र अधिविभागातील सेवाज्येष्ठतेनुसार दि. १ फेब्रुवारीपासून अधिविभागप्रमुखपदावर माझी नियुक्ती होणे अपेक्षित आहे.

मला जर या पदावर नियुक्त केले नाही, तर हा माझ्यासाठी प्रचंड मोठा धक्का असेल. मला आत्मदहन करण्यापासून काहीही पर्याय राहणार नाही. माझ्या या मानसिक स्थितीस आपण जबाबदार असाल, अशा उल्लेखाचा ई-मेल या विभागातील वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना रविवारी पाठविला आहे.

दरम्यान, या अधिविभागप्रमुखपदावरील नियुक्तीबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करावी. प्रा. डॉ. संजय चव्हाण यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात येऊ नये. या नियुक्तीबाबत विद्यापीठाने दाखल केलेली बेकायदेशीर याचिका तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. शिर्के यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रा. चव्हाण यांना विभागप्रमुखपदी नेमणूक देण्याबाबतच्या राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या आदेशाचे पालन विद्यापीठाने करावे, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ कास्ट्राईब महासंघाचे अतिरिक्त महासचिव आनंदराव खामकर यांनी केली आहे.

Web Title: Warning of self immolation from a senior professor at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.