कचऱ्याचा डोंगर वाढता वाढे...
By admin | Published: January 6, 2015 11:55 PM2015-01-06T23:55:00+5:302015-01-07T00:04:30+5:30
शहराचा प्रश्न गंभीर : कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कागदावरच
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील दररोजच्या दोनशे टन कचरा निराकरणाचा प्रश्न गंभीर बनला असून कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्तावीत असलेला ‘रोकेम’ कंपनीचा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. प्रकल्पासाठी जागेचा तिढा सुटत नसल्याने कचराप्रश्नी कोल्हापूरचीही कचरापूर म्हणून ओळख असलेल्या पुण्यासारखीच अवस्था झाली आहे.
पुणे शहरातील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या ‘रोकेम’ कंपनीचा ठेका रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पुण्यात दररोज दोन हजार टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील कचरा प्रश्न गंभीर वळणार पोहोचला आहे. पुण्यानंतर ‘रोकेम’ने कोल्हापुरातील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका मिळविला. निविदा मंजूर होऊन वर्ष उलटले. कंपनीने दीड कोटी बँक गॅरंटीसह ४० लाख रुपयांची अनामत रक्कमही महापालिकेकडे जमा केली आहे. मात्र, कंपनीला आवश्यक असणारी चार एकरांपैकी एक एकर जागाही झूम प्रकल्पावर उपलब्ध होऊ न शकल्याने प्रकल्प कागदावरच राहिला आहे तसेच ‘रोकेम’ला जागेअभावी पुण्यातील सुरू असलेला प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली आहे.
शहरात दररोज निर्माण होणारा २००टन कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न कोल्हापूर महापालिकेला सतावत आहे. कोंडाळ्यातच कचरा जाळणे, तीन-चार दिवसांनंतर उठाव करणे, झूम प्रकल्पातील वाळलेला कचरा जाळून जागा निर्माण करणे, आदी जुजबी उपाय मनपा प्रशासन करत आहे.
शहरात झूम प्रकल्पावर साचलेला तब्बल तीन लाख टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यामुळष
पुणे-नाशिकनंतर ‘सर्वांत वेगाने विस्तारणारे शहर’ असे बिरुद घेऊन वाटचाल करणाऱ्या कोल्हापूरची नवी ओळख ‘कचरापूर’ अशीच होत आहे.
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका
महापालिकेने रोकेम ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका दिला आहे. महापालिका प्रतिटन ३०८ रुपये दराने पैसे देऊन प्रकल्पापर्यंत कचरा पोहोच करणार आहे. हा दर तीस वर्षांपर्यंत स्थिर राहील यामध्ये बदल होणार नाही. प्रकल्पासाठी १ रुपया प्रति चौ. फू ट दराने महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. प्रकल्पसाठीचा किमान ३० कोटी रुपयांचा खर्च कंपनी करणार आहे.
पावसाळ्यानंतर राजारामपुरी परिसरातील टाकाळा खणीत ‘लँडफिल्ड साईट डेव्हलपिंग’(कचरा टाकण्याची शास्त्रीय जागा) तयार करण्याचे थांबलेले काम आता पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. झूम प्रकल्पातील कचऱ्याची चाळण करून राहिलेल्या कचऱ्याचे घटक (इनर्ट मटेरिअल) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निकषांनुसारच या खणीत टाकले जाणार आहेत. खणीचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतरच कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प दृष्टिक्षेपात येईल.
- डॉ. विजय पाटील (मुख्य आरोग्य निरीक्षक)
पाच हजार टन ई-कचऱ्याचे आव्हानवर्षाला पाच हजार टनांहून अधिक ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचा यक्षप्र्रश्न महापालिकेसमोर आहे. जागोजागी भंगार जमा करणाऱ्यांकडून सोने, चांदी, तांबे, लोखंड, अॅल्युमिनिअम, आदी धातंूच्या आमिषापोटी खराब झालेले टी.व्ही., कॉम्प्युटर, वायर्स व सीडी, आदीं ई-कचऱ्याची अशास्त्रीय विल्हेवाट लावली जात असल्याचे सहज दृष्टीस पडते. त्यामुळे क्लोरिन, सल्फर डायॉक्साईड, डायोक्सिन, क्लोरिनेटेड डायोक्सिन, पॉलिक्लिनिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, बेरिलियम कॅडमियम, आदी विषारी वायू व घटकांचा पर्यावरणात भडिमार केला जातो.