बियाणे, खतपुरवठ्यावर भरारी पथकाचा ‘वॉच’
By Admin | Published: November 17, 2014 12:11 AM2014-11-17T00:11:54+5:302014-11-17T00:24:16+5:30
तालुकानिहाय भरारी पथक प्रमुखांचे नाव, मोबाईल, कार्यालय क्रमांक खालीलप्रमाणे :
कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकरी विविध पिकांची पेरणी करीत आहेत. रब्बीचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक यांचा पुरवठा, विक्री, गुणवत्ता यांवर नियंत्रण राहावे यासाठी बारा भरारी पथकांची स्थापना केली आहे. पथक १५ डिसेंबरपर्यंत अचानकपणे कोणत्याही कृषिसेवा केंद्राची तपासणी करणार आहे. कारवाईत प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
महिनाभरापासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. यंदा खरिपाच्या पिकांची काढणी उशिरा होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांची पेरणीही उशिराने होत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. ही संधी हेरून काही दुकानदार जादा भावाने बियाणे, खते, कीटकनाशक यांची विक्री करून नफा मिळवीत असतात. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. साठेबाजीचे प्रकारही होतात. याला चाप बसावा यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने आज, शुक्रवारपासून जिल्ह्यात भरारी पथक कार्यरत केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशक यांच्याशी संबंधित कोणत्याही दुकानाविरोधात तक्रार करायची असल्यास भरारी पथक प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी एस. ए. मगदूम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय भरारी पथक प्रमुखांचे नाव,
मोबाईल, कार्यालय क्रमांक खालीलप्रमाणे :
जिल्हा प्रमुख : एस. ए. मगदूम - ९४०४९५४४०२,
०२३१-२६५५४०३.
करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील - ०२३१-२६८०२३३, ९९२२३१०९४०
हातकणंगले : व्ही. व्ही. देवकर - ०२३०-२४८३५२२, ९४०४९५४४२२
भुदरगड : बी. बी. कुंभार - ०२३२४-२२००९६, ७५८८०५८२७९
शाहूवाडी : ए. डी. भिंगारदेवे - ०२३२९-२२४१६७, ९४०४९९०७७७
पन्हाळा : आर. एम. राजमाने -०२३२८-२३५०६१, ९४०४९९१०९९
गडहिंग्लज : पी. पी. पाटील - ०२३२७ -२२४००५, ९८२२३४२०२२
गगनबावडा : एन. एस. परीट-०२३२६-२२२०९४, ९४२३२८६५६६
शिरोळ : यू. एस. लंगारे -०२३२२-२३६९१८, ९४२३०४२७०३
आजरा : एस. जी. निकम - ०२३२३-२४६३८२, ८२७५०६११५३
राधानगरी : आर. एन. रानगे - ०२३२१-२३४४४५, ८३०८१६०३४४
चंदगड : आर. आय. रूपनवर - ०२३२०-२२४१५३, ७५८८६२६८२३
कागल : एस. बी. वाघमारे - ०२३२५-२४४०८३, ९४२३८७०६२५
शेतकऱ्यांनी वरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.