केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील रस्त्याच्या कामावर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:19+5:302020-12-27T04:17:19+5:30

कोल्हापूर : महापालिकेकडून केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील करण्यात येत असणाऱ्या रस्त्याच्या कामावर आता शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा ...

'Watch' on road works in Keshavrao Bhosale Natyagriha area | केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील रस्त्याच्या कामावर ‘वॉच’

केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील रस्त्याच्या कामावर ‘वॉच’

googlenewsNext

कोल्हापूर : महापालिकेकडून केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील करण्यात येत असणाऱ्या रस्त्याच्या कामावर आता शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा वॉच राहणार आहे. कृती समिती सदस्य, कृती समितीचे अभियंता आणि महापालिका उपशहर अभियंता यांनी शनिवारी कामाची ठिकाणी पाहणी केली. रस्ता पुन्हा करायाला लागू नये यासाठी दर्जेदार रस्ता करा, अशा सूचना केल्या. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर कोर काढून शासकीय प्रयोगशाळेत तपासून घेऊ, यामध्ये गैरप्रकार आढळल्यास संंबधित ठेकेदारकडून नव्याने रस्ता करण्यास भाग पाडू, असा इशाराही देण्यात आला.

कृती समितीचे रमेश मोरे म्हणाले, शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. काही ठिकाणी नवीन रस्ते करण्याचे काम सुरू आहे. एस्टिमेटनुसार काम होते की नाही याची आम्हास शंका आहे. म्हणून डांबरी रस्ता करणारे तज्ज्ञ इंजिनिअर व कार्यकर्ते यांनी मिळून केशवराव भोसले नाट्यगृहासमोरील सुमारे २० वर्षांनंतर डांबरीकरण होत असलेल्या ठिकाणी पाहणी केली. महापालिका अभियंता, ठेकेदार यांना योग्य त्या सूचना देऊन रस्त्याची कामे व्यवस्थित करण्याचे आदेश द्यावेत. यावेळी उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रमोद बराले, ठेकेदार गणेश खाडे, कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, संभाजी जगदाळे, अभियंता रमेश पवार, महेश जाधव, गिरीश आरेकर, किशोर घाटगे आदी. उपस्थित होते.

फोटो : २६१२२०२० कोल केएमसी कृती समिती

ओळी : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील रस्ता दर्जदार करण्याच्या मागणीचे निवेदन शहर, जिल्हा, नागरी कृती समितीच्यावतीने महापालिकेचे उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांना देण्यात आले.

बातमीदार : विनोद

Web Title: 'Watch' on road works in Keshavrao Bhosale Natyagriha area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.