जलजागृती ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:33+5:302021-07-17T04:20:33+5:30

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ...

Water awareness is the need of the hour | जलजागृती ही काळाची गरज

जलजागृती ही काळाची गरज

Next

गडहिंग्लज : दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे भूजल साठ्याच्या नियोजनाबरोबरच जलजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.

जिल्हा परिषद आणि भूजल सर्वेक्षण-विकास यंत्रणा विभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित भूजल साक्षरता आणि जलजागृती याविषयावरील वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मगर म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे पारंपरिक स्त्रोत आणि जलसाठे यांची जपणूक व संवर्धन करण्याची गरज आहे. लोकसहभागातूनच हे काम शक्य आहे.

उपअभियंता उत्तम थोरात यांनी ‘भूजल पुनर्भरण’ या विषयावर, अणुजैविक तज्ज्ञ कृष्णमूर्ती सूर्यवंशी यांनी ‘पाणी गुणवत्ता व तपासणी’ तर पाणी गुणवत्ता सल्लागार बसवराज वाडेकर यांनी ‘पाणी शुद्धीकरण’ याविषयावर मार्गदर्शन केले.

चर्चासत्रात गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

उपलेखापाल किशोर कदम यांनी स्वागत केले. ऋषिराज गोसकी यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील चर्चासत्रात गटविकास अधिकारी शरद मगर यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : १६०७२०२१-गड-०५

Web Title: Water awareness is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.