धामोड बंधाऱ्यावर पाणी ;२० गावांसह धामणीखोऱ्याचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:22 PM2019-08-06T16:22:14+5:302019-08-06T16:22:30+5:30
धामोड परिसरात ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या पावसाने अक्षरश : थैमान घातले आहे . त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
धामोड - धामोड परिसरात ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या पावसाने अक्षरश : थैमान घातले आहे . त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . या अतिवृष्टीन तुळशी धरणही आता १०० टक्के भरले असुन धरणातून तुळशी नदीपात्रात ४९४७ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे .परिणामी २००६ नंतर पहिल्यांदाच येथील धामोड - कुरणेवाडी दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला आहे . त्यामुळे धामोड बाजारपेठेशी संपूर्णधामणीखोरा व परिसरातील २० गावांचा संपर्क तुटला आहे .
गेल्या दोन दिवसापासून धामोड परिसरात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे . या परिसरातील केळोशी बु॥ , खामकरवाडी हे दोन लघू प्रकल्प अगोदरच 'ओव्हरफ्लो 'झाले आहेत . त्यामुळे खामकरवाडी प्रकल्पाचे अतिरीक्ततपाणी अगोदर पासुनच तुळशी नदीपात्रात तर केळोशीचे पाणी तुळशी जलाशयात मिसळत होते .सद्या तुळशी जलाशय ही १०० टक्के भरला आहे . त्यामुळे तुळशीचे पाणी ही आता नदीपात्रात आल्याने पूरस्थिती गंभीर बनली आहे . दुसरीकडे पाऊस ही धो- धो कोसळत असल्याने मंगळवारी सकाळी ७ .३० वाजल्या नंतर तुळशीतुन मोठया प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे .
कालच जलाशयातून २००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते . पण धरणात येणाऱ्या पाण्याचा 'फ्लो ' फारच वाढल्याने पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणातून ४९४७ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडले असल्याचे शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांनी सांगीतले . या वाढलेल्या पाण्याने सद्या धामोड येथील बंधारा पाण्याखाली जाऊन धामोडबाजारपेठेशी संपर्क तुटला आहे .
धरण इतिहासात २००५ला ३५२ मिली मिटर व त्यानंतर काल सोमवारी ३३५मिली मिटर एवढा उच्चांकी पाऊस नोंद झाला आहे.
दुपारी दोन नंतर पाऊस वाढल्याने चांदे , कोते, धामोड- नऊनंबर ,लाडवाडी -कोते या पूलांवरती ही पाणी आले होते .