चिकोत्रा धरणासाठी दिंडेवाडी डोंगरातून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:18 AM2017-08-01T00:18:20+5:302017-08-01T00:19:10+5:30
गारगोटी : झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरणात पाणी येण्याचे स्रोत कमी असल्यामुळे आजअखेर केवळ दोनवेळाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या धरणाकडे येणाºया पाण्याचे मार्ग वाढविण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून दिंडेवाडी गावाच्या डोंगरावरील भावेश्वरी मंदिरापासून चर काढून पाणी धरण साठ्यात सोडले.

चिकोत्रा धरणक्षेत्रात पावसाची कमतरता व पाणी वाहून आणण्यासाठी कमी जलवाहिन्या यामुळेच धरण बांधल्यापासून केवळ दोनवेळा हे धरण भरले होते. आजपर्यंत ४५ ते ५० टक्के धरण भरते. त्यामुळेच या धरणाखाली येणाºया भिजक्षेत्रातील पिके पाण्याविना सुकून जातात. हे धरण भरण्यासाठी म्हातारीच्या पठारावर वनबंधारा बांधून तो बंधारा भरल्यानंतर पाणी या धरणाकडे वळविण्यात आले होते. परंतु, मेघोली ग्रामस्थांच्या भात रोप लावणीसाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे या पाण्यावरून वाद निर्माण झाला.
शेवटी तडजोडीअंती दोन्ही बाजूला निम्मे-निम्मे पाणी
लावण्यात आले. त्यामुळे भुदरगड पंचायत समिती माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्या प्रयत्नांतून आमदार हसन मुश्रीफ यांच्या निधीतून दिंडेवाडी गावाच्या पूर्वेला डोंगरावर असलेल्या भावेश्वरी मंदिराच्या परिसरातून सुमारे अडीच कि.मी. चर मारून तेथून पाणी या धरणात सोडण्यात येणार आहे.
या कामाचा प्रारंभ विश्वनाथ कुंभार, शशिकांत खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, दिंडेवाडी (भावेश्वरी) मंदिरापासून झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरणाकडे नदीच्या पात्रात पावसाळ्यामधील वाया जाणारे पाणी अडीच कि.मी.ची चर काढून आणून सोडणे आमदार मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने शक्य झाले आहे. भविष्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दृष्टीने विचारपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.