दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:56 PM2021-06-17T17:56:28+5:302021-06-17T17:57:25+5:30
Rain Kagal Kolhapur : बुधवारी पहाटेपासुन सुरू झालेल्या पावसामुळे कागल तालुक्यातील दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नदया वरील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेरनदयावरील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद
कागल : बुधवारी पहाटेपासुन सुरू झालेल्या पावसामुळे कागल तालुक्यातील दुधगंगा आणि वेदगंगा नदयांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नदयावरील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.
दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने काठावरील पीके पाण्याखाली गेली आहेत. बाचणी पुलावर पाणी आले आहे. सिद्धनेर्ली वंदुर बंधाराही पाण्याखाली गेला आहे.
सुळकुड बंधारा जरी पाण्याखाली गेला असला तरी नवीन पुलामुळे वाहतुक सुरळीत आहे. वेदगंगा नदीवरील सोनगे- बाणगे, कुरणी- मुरगुड ,मळगे- सुरूपली हे बंधारेही पाण्याखाली जाऊन वाहतुक बंद करण्यात आली आहे.