रखडलेल्या ड्रेनेजलाईनवरून जल अभियंताची खरडपट्टी, नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 10:44 AM2019-10-30T10:44:59+5:302019-10-30T11:21:07+5:30

ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली.

Water engineer slammed from civilian drainage line, civilian aggressive | रखडलेल्या ड्रेनेजलाईनवरून जल अभियंताची खरडपट्टी, नागरिक आक्रमक

ड्रेनेजलाईनच्या कामाची पाहणी करताना आमदार चंद्रकांत जाधव, सोबत नगरसेवक संभाजी जाधव, राजाराम गायकवाड, राहुल चव्हाण, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देरखडलेल्या ड्रेनेजलाईनवरून जल अभियंताची खरडपट्टी, नागरिक आक्रमकनूतन आमदार चंद्रकांत जाधव यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी

कोल्हापूर : ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली.

महापालिकेने खानविलकर पेट्रोलपंप, ध्रुव रेसिडेन्सीसमोर ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी खुदाई केली आहे. एक महिन्यात पूर्ण होणारे काम सहा महिने झाले तरी अपूर्णच आहे. परिणामी नागरिकांसह विके्रत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील ढिगाऱ्यावर दीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी करत महापालिकेचा निषेध केला होता. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली. आमदार जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला.

यावेळी अधिकाऱ्यांनी रविवारी पाहणी करू, अशी ग्वाही दिली होती. यानुसार आमदार जाधव यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, राहुल चव्हाण, संभाजी जाधव, दिलीप देसाई, उत्तम फराकटे, आप्पासाहेब होडगे, डॉ. बुद्धीराज पाटील, डॉ. दीपक पाटील, अभिजित शिंदे उपस्थित होते.

पेठेतील लोक गप्प बसले असते काय

गेल्या सहा महिन्यांपासून काम पूर्ण झालेले नाही. परिसरात ज्येष्ठ नागरिक असून, त्यांची तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येथे येऊ शकत नाही. एखाद्या पेठेत असे काम रखडले असते तर ते गप्प बसले असते काय ?, आमच्या सहनशीलतेचे अंत पाहू नका, अशा शब्दांत नागरिकांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांची खरडपट्टी केली. काम पूर्णत्वाची लेखी डेडलाईन दिल्याशिवाय पुन्हा काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली.

चर्चेचे फड रंगविण्यापेक्षा समस्या सोडवा : आमदार जाधव ही भडकले

काम सुरू करतेवेळी काम केव्हा पूर्ण होणार याचे फलक का लावला नाही. कामाच्या संपूर्ण माहितीचे फलक तातडीने लावा. नुसत्याच चर्चेचे फड रंगविण्यापेक्षा समस्या तातडीने कशी सुटेल, यासाठी प्रयत्न करा, असे खडेबोल आमदार जाधव यांनी जलअभियंता आणि ठेकेदाराला सुनावले. 

निधीमुळे नव्हे, पावसामुळे कामाला विलंब

राजहंस प्रिंटिंग पे्रस परिसरात अनेक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये सांडपाणी येते. येथील कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी २४ मे रोजी कामाला सुरुवात केली. जुलैअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती; परंतु महापूर आणि त्यानंतर सततच्या पावसामुळे तसेच काळी माती असल्यामुळे खुदाईला अडथळे निर्माण झाले. निधी नाही म्हणून काम थांबले नाही तर पावसामुळेच कामाला विलंब झाल्याची कबुली महापालिका प्रशासनाने यावेळी दिली.

 

 

Web Title: Water engineer slammed from civilian drainage line, civilian aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.