सरपंच पदासाठी इच्छूकांच्या अपेक्षांवर पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:07 PM2021-01-29T12:07:22+5:302021-01-29T12:56:48+5:30

कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

Water on the expectations of aspirants for the post of Sarpanch! | सरपंच पदासाठी इच्छूकांच्या अपेक्षांवर पाणी !

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी गुरुवारी हार्दिक कराळे याच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी पाच सरपंच पदे तर ३१ महिलांसाठी राखीव

कणकवली : कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

तालुक्यातील ६३ पैकी ३१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत . यात अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील २ महिलांसाठी , अनुसूचित जमातीसाठी १ तसेच नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती असून त्यातील ८ महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील ४० पैकी २० ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत .

कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात गुरुवारी हार्दिक कराळे या छोट्या बालकाच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार, निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , पंचायत समिती सभापती मनोज रावराणे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जाहीर करण्यात आलेले ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण विविध प्रवर्ग तसेच ग्रामपंचायत नुसार अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.

  • अनूसूचित जाती प्रवर्ग - जानवली, तरंदळे,कसवण - तळवडे.
  • अनूसूचित जाती प्रवर्गातील महिला - ओटव, नागवे.
  • अनुसूचित जमाती प्रवर्ग - हळवल.
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग - असलदे, कुरंगवणे- बेर्ले , गांधीनगर, कोळोशी, शिवडाव, कळसुली, डामरे, पियाळी, नांदगाव.
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -कुंभवडे, करूळ, दारोम , भिरवंडे ,वांयगणी, शेर्पे,सातरल पिसेकामते.
  • सर्व साधारण महिला- माईण,वाघेरी,वारगाव,कासार्डे,आयनल, दारिस्ते,ओझरम,सावडाव,नडगीवे, तोंडवली -बावशी,वरवडे,बिडवाडी, हुंबरट,बोर्डवे,कासरल,शिरवल,फोंडाघाट, ओसरगाव,करंजे,खारेपाटण. 
  • सर्वसाधारण प्रवर्ग - लोरे, बेळणे खुर्द, भरणी, चिंचवली , दिगवळे, आशिये, हरकुळ खुर्द, साकेडी, तळेरे, तिवरे, वागदे, कलमठ, सांगवे, नरडवे, घोणसरी, नाटळ, कोंडये, साळीस्ते , शिडवणे, हरकुळ बुद्रुक या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचा समावेश आहे.

 

Web Title: Water on the expectations of aspirants for the post of Sarpanch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.