पावसामुळे मांडूकलीत पाणी; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग रात्रीपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2023 12:16 IST2023-07-23T12:15:30+5:302023-07-23T12:16:03+5:30
कुंभी धरणाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे.

पावसामुळे मांडूकलीत पाणी; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग रात्रीपासून बंद
प्रकाश काळे
वैभववाडी: तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली नजीक रात्रीपासून पाणी आले आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग ठप्प झाल्याने सिंधुदुर्गातून जाणारी वाहतूक राधानगरी मार्गे वळविण्यात आली आहे.
कुंभी धरणाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. महामार्गावर मांडूकली नजीक रस्त्यावर जवळपास दोन-अडीच फूट पाणी असल्याने प्रशासनाने मार्ग वाहतुकीला बंद केला आहे.
कोकणातून करुळ व भुईबावडा घाटमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रात्रीपासून फोंडाघाट, राधानगरीमार्गे वळविण्यात आल्या आहेत. पावसाने जोर असाच कायम राहिल्यास हा मार्ग पुढील काही दिवस बंदच राहणार आहे.