नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी; कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:07 AM2022-08-09T11:07:29+5:302022-08-09T11:08:22+5:30
मंदिरात पाणी आल्याने चालू सालातील दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा होईल
नृसिंहवाडी : सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात नदीच्या पाणी पातळीत दहा फुटाने वाढ झाली. कृष्णेचे पाणी आज सकाळी दत्त मंदिरात शिरले. श्रावण महिन्यात नित्य होणारी रुद्र एकादशिणी मंदिरात नदीच्या पाण्यात राहून झाली.
मंदिरात पाणी आल्याने चालू सालातील दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा होईल. श्रावण महिना, मंगळवार, प्रदोष असलेने व दिवसा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता असलेने मंदिरात स्नानासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मंदिर प्रशासनाने याची दक्षता घेऊन सुरक्षा वाढविली आहे.
दरम्यान मंदिर परिसरातील सर्व साहित्य कर्मचारी व सेवेकरी वर्गाने सुरक्षित स्थळी हलविले असलेची माहिती दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे व सचिव संजय नारायण पुजारी यांनी दिली.