हिमालयसह पाच गडावरून जलाभिषेकासाठी पाणी

By admin | Published: May 10, 2017 05:35 PM2017-05-10T17:35:13+5:302017-05-10T17:35:13+5:30

शिवराज्याभिषेक सोहळ््यासाठी ‘कोल्हापूर हायकर्स’चा उपक्रम

Water from Jalgaon to five gates along the Himalayas | हिमालयसह पाच गडावरून जलाभिषेकासाठी पाणी

हिमालयसह पाच गडावरून जलाभिषेकासाठी पाणी

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : राजगडावर ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ््यासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे हिमालयसह महाराष्ट्रातील पाच गडांवरून जलाभिषेकासाठी पाणी आणण्यात येणार आहे, अशी माहिती हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, याच सोहळ््याचा एक भाग म्हणून गतवर्षी कोल्हापूर हायकर्सतर्फे हिमालयातील भिग्रूलेक व महाराष्ट्रातील पाच गडांवरून जलाभिषेकासाठी पाणी आणले होते. यंदाही असाच मनसुबा धरून हिमालयातील प्रिप्रांजल पर्वतरांगामधील माऊंट पतालसू या शिखरावरून तसेच महाराष्ट्रातील रोहिडा, कमळगडा, केंजळगड, रायरेश्वर, कावळा किल्ला गडावरून आणि शिवतरघळ येथून पवित्र जल आणण्यात येणार आहे. यासाठी विशेष दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

एक टीम हिमालयातील खडतर अशा माऊंट पतालसू हिमशिखरावरून जल घेऊन येईल तर दुसरी टिम महाराष्ट्रातील अन्य गडांवरून पाणी घेऊन येईल. त्यामध्ये सागर पाटील, समीर डकरे, आशिष काळे, अमित पाटील, वरद अवटे, अमोल पाटील, जयदीप पाटील, विनायक सुतार, डॉ. अमृता पाटील, डॉ. सुमित्रा रावळ, राकेश सराटे, निरसिंह चव्हाण, संजय कुलकर्णी यांच्यासह शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. दोन्ही ठिकाणांवरील पवित्र जल ५ जूनला एकत्रितरित्या रायगडावर पोहोचणार आहेत.

Web Title: Water from Jalgaon to five gates along the Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.