गणेशवाडीच्या पाझर तलावाची पाण्याची पातळी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:55+5:302021-04-29T04:17:55+5:30
शिवराज लोंढे सावरवाडी : गणेशवाडी ( ता. करवीर ) गावच्या पाझर तलावात पाण्याची पातळी घटल्याने पाण्याअभावी शेतीपिकांचे नुकसान ...
शिवराज लोंढे
सावरवाडी : गणेशवाडी ( ता. करवीर ) गावच्या पाझर तलावात पाण्याची पातळी घटल्याने पाण्याअभावी शेतीपिकांचे नुकसान होऊ लागले आहे.
राज्य शासनाच्या जलसंरक्षण विभागाने पंधरा वर्षांपूर्वी या पाझर तलावाची उभारणी केली. या तलावाची पाणी साठवण क्षमता ११८. ५८ मीटर असून यावर २५ हेक्टर शेतजमीन लाभक्षेत्रात आहे. हा पाझर तलाव दरवर्षी पावसाळ्यात भरला जातो. ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर या तलावातील पाणी वापरले जाते. मात्र, तलावाच्या भरावातून गळती लागल्याने हळूहळू पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेती पिकांना पाणीटंचाईचा फटका बसत असून डोंगरी भागात उभारलेल्या या पाझर तलावाची दुरुस्ती करण्याबरोबरच याची पाणी साठवण क्षमताही वाढविणे गरजेचे बनले आहे.
चौकट :
कपडे व जनावरे धुण्यास बंदी घालावी
पाझर तलावामध्ये कपडे व जनावरे धुतली जातात. त्यामुळे पाणी दूषित बनून उन्हाळ्यात दुर्गंधी पसरते. त्यामुळे कपडे व जनावरे धुण्यास बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तलावामध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. या व्यवसायातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळू शकेल
कोट : गणेशवाडी गावच्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधी उपलब्ध झाला नाही. रुंदीकरण, गाळ काढणे, गळती काढणे, यासारखी कामे करणे गरजेचे आहे. आहेत. राज्य शासनाने यासाठी निधी मंजूर करावा.
दादासाहेब लाड,
सरपंच ग्रा. पं. गणेशवाडी.
फोटो : २८ गणेशवाडी तलाव
ओळ - = गणेशवाडी (ता. करवीर) येथील पाझर तलावाची पाण्याची पातळी घटल्याने शेतीपिकांचे नुकसान होऊ लागले आहे.