राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत अडीच फुटांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:59+5:302021-05-18T04:24:59+5:30
राजाराम बंधाऱ्याजवळ रविवारी सकाळी ९ वाजता १० फूट १ इंच इतकी पाणीपातळी होती. मात्र दिवस-रात्र जोरदार पाऊस झाल्याने या ...
राजाराम बंधाऱ्याजवळ रविवारी सकाळी ९ वाजता १० फूट १ इंच इतकी पाणीपातळी होती. मात्र दिवस-रात्र जोरदार पाऊस झाल्याने या पाणीपातळीत सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पातळी २ फूट ७ इंचाने वाढून ती साडेबारा फुटांवर पोहोचली. १७ फूट पाणी पातळीला बंधारा पाण्याखाली जातो. एकदा बंधारा पाण्याखाली गेला की या मार्गावरील वाहतूक किमान चार महिने ठप्प होते.
सध्या बंधाऱ्याच्या प्लेटा (बरगे) काढलेले नसल्याने या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. येत्या १ जूनला नियमाप्रमाणे या बंधाऱ्याच्या प्लेटा पाटबंधारे विभागाकडून काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या बंधाऱ्यातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.
फोटो: १७ बावडा बंधारा
रविवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत तब्बल अडीच फुटाने वाढ झाली आहे.
(फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )