पाटणकर कॉलनीत पाण्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:55+5:302021-03-15T04:21:55+5:30
कोल्हापूर : न्यू शाहूपुरी, बेकर गल्ली, पाटणकर कॉलनीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. कमी दाबाने तोही केवळ अर्धा ...
कोल्हापूर : न्यू शाहूपुरी, बेकर गल्ली, पाटणकर कॉलनीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. कमी दाबाने तोही केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होतो. त्यामुळे खर्चाला सोडाच, पिण्याच्याही पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बेकर गल्ली येथील रस्त्याचे काम सुरू झाले, तेव्हापासून पाटणकर कॉलनीमध्ये पाण्याची समस्या सुरू झाली असल्याची तक्रार येथील काही नागरिकांतून होत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे वरच्या मजल्यावर पाणी जात नाही. ज्यांनी मोटारी बसवल्या आहेत, त्यांनाच वरच्या मजल्यावर पाणी मिळत आहे. इतरांची मात्र, पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. या प्रभागात पाणीपुरवठा ज्या टाकीतून होतो, त्याचे काम सुरू असल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याची कारणे प्रशासनाकडून दिली जात आहेत. टाकीचे काम लवकरच होणार असून त्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, असेही ते म्हणत आहेत.