‘आग्रा ते राजगड’ मोहिमेकरिता जिल्ह्यातील नद्यांचे पाणी सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:40+5:302021-08-14T04:30:40+5:30

छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेतली. जणू हा हिंदवी स्वराज्याचा पुनर्जन्म जाला. सुटकेस ३५५ वर्षे झाली. त्यांच्या झुंजार ...

Water from rivers in the district handed over for 'Agra to Rajgad' campaign | ‘आग्रा ते राजगड’ मोहिमेकरिता जिल्ह्यातील नद्यांचे पाणी सुपूर्द

‘आग्रा ते राजगड’ मोहिमेकरिता जिल्ह्यातील नद्यांचे पाणी सुपूर्द

googlenewsNext

छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेतली. जणू हा हिंदवी स्वराज्याचा पुनर्जन्म जाला. सुटकेस ३५५ वर्षे झाली. त्यांच्या झुंजार लढ्याची प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी राज्यातील ३० मावळे आग्रा ते राजगड ही १२०० कि.मी.ची मोहीम राबवित आहेत. आग्रा ते राजगड हे १२०० कि.मी.चे अंतर १७ ते २९ ऑगस्ट या १२ दिवसांत चार राज्यांतून ५८ शहरांतून रोज १०० कि.मी. धावत पूर्ण करणार आहेत. या मोहिमेत कोल्हापूरचा हिलरायडर्सचा शिलेदार सूरज ढोली हाही सहभागी होणार आहे. त्याच्याकडे शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात कोल्हापुरातील सर्व नद्यांच्या पाण्याने भरलेला पवित्र कलश सुपूर्द करण्यात आला. यावेळी हिलरायडर्सचे विनोद कांबोज, प्रमाेद पाटील व मान्यवर उपस्थित होते.

फोटो : १३०८२०२१-कोल-हिलरायडर्स

आेळी : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात शुक्रवारी हिलरायडर्सतर्फे आग्रा ते राजगड मोहिमेसाठी जाणाऱ्या सूरज ढोली यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाण्याचा पवित्र कलश सुपूर्द करण्यात आला.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Water from rivers in the district handed over for 'Agra to Rajgad' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.