निम्या कोल्हापूर शहरात सोमवारी पाणी पुरवठा खंडीत

By भीमगोंड देसाई | Published: December 9, 2023 05:43 PM2023-12-09T17:43:59+5:302023-12-09T17:45:28+5:30

कोल्हापूर : पुईखडी येथील ११० केव्ही सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याने सोमवारी (दि.११) निम्मा शहरातील ...

Water supply cut in half of Kolhapur city tomorrow | निम्या कोल्हापूर शहरात सोमवारी पाणी पुरवठा खंडीत

निम्या कोल्हापूर शहरात सोमवारी पाणी पुरवठा खंडीत

कोल्हापूर : पुईखडी येथील ११० केव्ही सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याने सोमवारी (दि.११) निम्मा शहरातील पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

ए, बी, वॉर्डतर्गंत पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, किर्ती हौसिंग सोसायटी, कोळेकर तिकटी, पोतणीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टीस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापू रामनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकर नगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवलेमळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स, राजीव गांधी, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाष नगर पंपिंग वरील ग्रामीण भाग, 

पाचगाव, आरकेनगर, पुईखडी, जिवबा नाना, विशालनगर, आयसोलेशन, वाय. पी. पोवारनगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आरकेनगर, जरगनगरले आऊट तसेच ई वॉर्डातील संपूर्ण राजारामपुरी, शाहू मील, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल परिसर, सम्राट नगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, 

उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, लोणार वसाहत, शाहू मील कॉलनी, राजीव गांधी वसाहत, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, शाहूपुरी व्यापारपेठ, शाहूपूरी एक ते चार गल्ली, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर आदी भागात सोमवारी पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Water supply cut in half of Kolhapur city tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.