चार शासकीय कार्यालयातील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:01+5:302021-02-05T07:17:01+5:30

कोल्हापूर : शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय, विभागीय वन अधिकारी निवासस्थान, वनक्षेत्रपाल, वन निरीक्षक निवासस्थान व कार्यालय ...

Water supply to four government offices shut down | चार शासकीय कार्यालयातील पाणीपुरवठा बंद

चार शासकीय कार्यालयातील पाणीपुरवठा बंद

Next

कोल्हापूर : शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय, विभागीय वन अधिकारी निवासस्थान, वनक्षेत्रपाल, वन निरीक्षक निवासस्थान व कार्यालय या शासकीय कार्यालयाकडील त्यांची नळ कनेक्शन गुरुवारी थकबाकीपोटी खंडित करण्यात आली.

गेले दोन दिवस पाणीपट्टी विशेष वसुली मोहिमेअंतर्गत शहरातील शासकीय कार्यालयाकडील थकबाकीदारांवर कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. गुरुवारी ताराबाई पार्क येथील विभागीय वन अधिकारी निवासस्थान, वनक्षेत्रपाल, वन निरीक्षक गृह, विभागीय वन अधीक्षक, विभागीय वन अधिकारी यांचे निवासस्थान व कार्यालयाकडील एकूण आठ कनेक्शनपैकी तीन कनेक्शन महापालिकेने खंडित केली.

या कार्यालयाची दोन लाख ९६ हजार इतकी थकबाकी होती. ही थकीत रक्कम संबंधित कार्यालयाने कनेक्शन तोडल्यानंतर धनादेशाद्वारे भरणा केली आहे. आर.टी.ओ. कार्यालयाची ६८ हजार रुपये थकबाकी असल्याने त्यांचे कनेक्शन खंडित करण्यात आले. त्याचबरोबर शास्त्रीनगर, राजारामपुरी या भागातील काही थकबाकीदारांवरही आज कारवाई करुन ६४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

ही कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जलअभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

- स्पॉट बिल कलेक्शन साडेतीन कोटींची वसुली -

मोबाईल स्पॉटबिल कलेक्शन प्रणालीमार्फत १ एप्रिल २०२० ते २८ जानेवारी २०२१ अखेर तीन कोटी ३५ लाख ५१ हजार ८७२ रुपयांची वसुली या विभागाने केली. १६ हजार ८२८ ग्राहकांनी या प्रणालीचा वापर केला या प्रणालीचा उपयोग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Web Title: Water supply to four government offices shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.