कोल्हापुरात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:07 AM2019-11-27T01:07:29+5:302019-11-27T01:07:41+5:30

कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? ...

Water supply system in Kolhapur | कोल्हापुरात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा

कोल्हापुरात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा

Next

कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून विचारला जात आहे. चार दिवसांपूर्वी कळंबा टाकी व बुद्धीहाळकरनगर येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले नाही, तोवरच आता शुक्रवारी (दि. २९) चंबुखडीजवळील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या दिवशी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
शिंगणापूर आणि बालिंगा योजनेवरील दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगून प्रत्येक आठवड्याला सतत पाणीपुरवठा खंडित ठेवला जात आहे. पूर्वी कधी तरी सहा महिन्यांतून एकदा दुरुस्तीचे काम हाती घेतले जात होते, परंतु अलीकडे प्रत्येक आठवड्यात दुरुस्ती काढली जात आहे. दोन्ही पैकी एका योजनेचा पाणीपुरवठा बंद ठेवला तर त्याचा परिणाम निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असून, अशा वारंवार खंडित होणाºया पाणीपुरवठ्याला शहरवासीय वैतागले आहेत.
महापुराच्या काळात संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सलग पंधरा दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी परिस्थिती गंभीर असूनही शहरवासीयांनी वास्तव लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य केले; पण आता सगळी यंत्रणा चांगली असताना, नदीत पाणी मुबलक असताना पुन्हा पुन्हा पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त भावना आहेत.
बालिंगा पंपिंग ते चंबुखडी संतुलन टाकीकडे जाणाºया मुख्य उपसा जलवाहिनीस वॉशआऊट व्हॉल्व्ह बसविण्याचे काम शुक्रवारी सकाळी हाती घेतले जाणार आहे. या दिवशी पाणी उपसा पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. परिणामी ए, बी, सी, डी वॉर्डांतील पाणीपुरवठा होणार नाही.
शहरातील : पाणी न येणाºया भागांची नावे
ए, बी वॉर्ड, त्यास सलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणाºया लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग.
सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ तालीम, लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, मिरजकर तिकटी.
ई वॉर्ड व त्यास संलग्नित शाहूपुरी ५वी, ६वी गल्ली, कुंभार गल्ली, पार्वती टॉकीज, खानविलकर पेट्रोल पंप, उद्यमनगर परिसर.

Web Title: Water supply system in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.