सोमवारी पाणीपुरवठा बंद, मंगळवारीही कमी दाबाने पाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:24 PM2019-09-14T12:24:11+5:302019-09-14T12:25:05+5:30
शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपला चंबुखडी टाकीनजीक गळती सुरू झाल्यामुळे सोमवारी (दि. १६) सदर गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे; त्यामुळे या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरात सदर दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
कोल्हापूर : शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपला चंबुखडी टाकीनजीक गळती सुरू झाल्यामुळे सोमवारी (दि. १६) सदर गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे; त्यामुळे या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरात सदर दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व खासगी टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवस नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन शहर पाणी पुरवठा विभागाने केले आहे. या कालावधीमध्ये बालिंगा, कसबा बावडा व कळंबा जलशुद्धिकरण केंद्राद्वारे नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
- या भागात पाणी येणार नाही
- साळोखेनगर, कणेरकर नगर, बापूरामनगर, आय. टी. आय, कळंबा जेल, आपटेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबानाना पार्क , सुभाषनगर पंपिंगवर अवलंबून असणारा भाग, दादू चौगुले नगर, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संभाजीनगरचा काही भाग, एल. आय. सी. कॉलनी, देवकर पाणंदचा काही भाग, साळोखे पार्क, जवाहर नगर, वाय. पी. पोवार नगर, टिंबर मार्केट, गंजीमाळ, वारे वसाहत व विजयनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग.
- ई वॉर्डातील राजारामपुरी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असणारा सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, उद्यमनगर, राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, शाहूपुरीतील (काही भाग), पाच बंगला, साईक्स एक्स्टेंशन, कावळा नाका, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल, सह्याद्री सोसायटी, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, महाडिक वसाहत.