सोमवारी रात्री अगर मंगळवारी पाणी पुरवठा होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:23 AM2021-08-01T04:23:55+5:302021-08-01T04:23:55+5:30

कोल्हापूर : शिंगणापूर उपसा केंद्राकडील दुरुस्तीसाठी दिलेल्या मोटारी जोडण्याचे काम सोमवारी दिवसभर चालणार आहे. त्यामुळे त्याचदिवशी सायंकाळी अथवा मंगळवारी ...

The water supply will start on Monday night or Tuesday | सोमवारी रात्री अगर मंगळवारी पाणी पुरवठा होणार सुरु

सोमवारी रात्री अगर मंगळवारी पाणी पुरवठा होणार सुरु

Next

कोल्हापूर : शिंगणापूर उपसा केंद्राकडील दुरुस्तीसाठी दिलेल्या मोटारी जोडण्याचे काम सोमवारी दिवसभर चालणार आहे. त्यामुळे त्याचदिवशी सायंकाळी अथवा मंगळवारी पाणी पुरवठा पूर्ववत सुरु होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने वर्तवली आहे. महापुरात उपसा केंद्रातील मोटारी पूर्णपणे बुडाल्याने त्या हिटींग करण्यासाठी जादा वेळ लागत आहे, त्यामुळे पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, नागदेववाडी उपसा केंद्र सुरु झाल्याने एबीसीडी या चारही प्रभागांतील बहुतांशी ठिकाणी पाणी पुरवठा शनिवारी सकाळपासून सुरळीत झाला. शिंगणापूर उपसा केंद्राची मोटार दुरुस्ती अद्याप पूर्ण न झाल्याने संपूर्ण ई प्रभागातील पाणी पुरवठा अद्याप बंदच आहे.

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे शहराला पाणी पुरवठा उपसा करणारी सर्व केंद्रे पाण्यात बुडाल्याने गेले आठवडाभर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. या उपसा केंद्रातील महापुराचे पाणी कमी होईल तसे मोटारी बाहेर काढून दुुरुस्तीनंतर त्या सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. सध्या कळंबा, बालीगा, नागदेववाडी उपसा केंद्रातून पाणी पुरवठा सुरु झाला आहे. नागदेववाडी उपसा केंद्रावर आधारित असणाऱ्या विशेषत: एबीसी या भागाला शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरु झाला आहे.

शिंगणापूर उपसा केंद्रातील सातही मोटारी दुरुस्तीसाठी दिल्या आहेत. स्टार्टर पॅनेल, सबस्टेशन यार्ड, ट्रान्सफार्मरची चाचणी घेतली आहे. सोमवारी दिवसभर मोटारी बसविण्याचे काम सुरु राहणार आहे, त्याचदिवशी रात्री अगर सोमवारपासून सर्वच भागाला पाणी पुरवठा सुरुळीत होईल, असा विश्वास पाणी पुरवठा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दिवसभरात २३२ फेऱ्यांद्वारे टॅंकरने पाणी पुरवठा

शनिवारी दिवसभरात महापालिकेच्या टॅंकरद्वारे १२९ फेऱ्या तर खासगी टॅंकरच्या १९४ अशा एकूण ३२३ फेऱ्यांद्वारे शहरात मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात आला. यासाठी शिवाजी विद्यापीठ पाणी उपसा केंद्रातून १०५ फेऱ्या, कसबा बावडा येथून ७२ तर कळंबा उपसा केंद्रातून टॅंकरच्या १४६ फेऱ्या झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. यापैकी बहुतांशी फेऱ्या ह्या ई वाॅर्डात झाल्या आहेत.

फोटो नं. ३१०७२०२१-कोल-शिंगणापूर पंप

ओळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणी उपसा केंद्राच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

310721\31kol_11_31072021_5.jpg

ओळ : शहराला पाणीपुरवठा करणार्या शिंगणापूर पाणी उपसा केंद्राची दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

Web Title: The water supply will start on Monday night or Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.