Kolhapur: ठिकपुर्ली येथे थेट पाईपलाईनच्या गळती दुरुस्तीत लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:45 AM2024-01-20T11:45:28+5:302024-01-20T11:46:35+5:30

तुरंबे : थेट पाईपलाईनची ठिकपुर्ली येथील गळती काढण्याचे काम सुरू आहे. पाईपमधील पाणी कमी करण्यासाठी तुरंबे व कपिलेश्वर येथील ...

water wasted in direct pipeline leak repair at Thikpurli kolhapur | Kolhapur: ठिकपुर्ली येथे थेट पाईपलाईनच्या गळती दुरुस्तीत लाखो लिटर पाणी वाया

छाया- व्ही. जे. साबळे

तुरंबे : थेट पाईपलाईनची ठिकपुर्ली येथील गळती काढण्याचे काम सुरू आहे. पाईपमधील पाणी कमी करण्यासाठी तुरंबे व कपिलेश्वर येथील व्हॉल्व्ह मोकळे केले. यामधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. थेट पाईपलाईनचे पाणी अडविण्याचे व्हॉल्व्ह कुचकामी ठरत आहेत.

ठिकपुर्ली गावाजवळ थेट पाईपलाईनला गळती होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे व पुलाचे काम करत असताना या ठिकाणी असलेला पाण्याचा व्हॉल्व्ह बुजविण्यात आला होता. त्यातूनच पाण्याची गळती सुरू होती. या ठिकाणी चेंबर बांधण्यासाठी खुदाई करत असताना मोठ्या प्रमाणात गळती लागली. गेल्या आठ दिवसांपासून या पाईपमधील पाण्याचे प्रेशर कमी झाले नाही. म्हणून आज तुरंबे व कपिलेश्वर या ठिकाणचे दोन व्हॉल्व्ह पूर्णपणे रिकामे केले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडत आहेत. लाखो लिटर पाणी ओढ्यातून दूधगंगा नदीपात्रात जात आहे. 

गळती लागल्यानंतर पाईप मधील पाणी अडवण्यासाठी व्हॉल्व्ह रिकामे केले आहेत तर काही व्हॉल पाईप मधील हवा जाण्यासाठी आहेत. पाणी अडवण्याचे व्हॉल कुचकामी ठरत आहेत त्यामुळे गळती लागल्यानंतर पूर्ण पाईप मधील पाणी कमी झाल्याशिवाय गळतीचे कामच करता येत नाही यामुळे सुमारे ५२ किलोमीटर पाईप मधील पाणी वाया जात आहे.ठिकपुर्ली येथील गळती काढण्यासाठी सुमारे १२ किलोमीटर परिसरातील हॉल रिकामे केले आहेत.

Web Title: water wasted in direct pipeline leak repair at Thikpurli kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.