वारणा धरणातून पाणी सोडणार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

By विश्वास पाटील | Published: July 26, 2023 10:20 AM2023-07-26T10:20:15+5:302023-07-26T10:22:06+5:30

त्यामुळे नदीकाठच्या लोकांना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Water will be released from Warana Dam; Great rise in water level | वारणा धरणातून पाणी सोडणार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

वारणा धरणातून पाणी सोडणार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

विश्वास पाटील 

कोल्हापूर : वारणा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता आज बुधवारी सकाळी ११.०० वाजता धरणांतून चालू असलेल्या विसर्गात वाढ करुन वक्र द्वार मधून १५४५ क्युसेक्स व विद्युत जनित्र मधून ९११ क्युसेक्स असे एकुण २४५६ क्युसेक्स सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Water will be released from Warana Dam; Great rise in water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.