जलवाहिनीच्या कामात ‘ढपला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:45 AM2018-10-24T00:45:07+5:302018-10-24T00:45:11+5:30

कोल्हापूर : शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत व्हायचा तो होऊ दे, नवीन जलवाहिनी कधी टाकायच्या ते टाकू देत पण आमचं ...

Waterlogged | जलवाहिनीच्या कामात ‘ढपला’

जलवाहिनीच्या कामात ‘ढपला’

Next

कोल्हापूर : शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत व्हायचा तो होऊ दे, नवीन जलवाहिनी कधी टाकायच्या ते टाकू देत पण आमचं काय? असा सवाल विचारणाऱ्या नगरीच्या सेवकांना जेमतेम बोनस देऊन ‘कारभाºयां’नी मोठा ढपला पाडल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे. १०८ कोटींच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामात समान व समाधानकारक वाटपाचे सूत्र बदलल्याने ही चर्चा नाराज झालेल्यांकडून पुढे आली आहे.
‘कारभाºयां’नी नेहमीच्या पद्धतीने याही प्रकरणात ‘हात’ मारल्यामुळे कोणाला ५५ हजारांचा तर कोणाला पावणेदोन लाखांचा बोनस मिळाला आहे. बाकीचा सर्व बोनस ठराविक ‘कारभाºयांनी’च लाटल्याचे समजते. त्यामुळे पालिका वर्तुळात नव्यानेच चर्चेला सुरुवात झाली आहे.
शहरात १०८ कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. आपल्याच कारकिर्दीत हे काम मंजूर व्हावे म्हणून तत्कालिन बावडेकर सभापतींनी फारच आग्रह धरला होता. परिपूर्ण प्रस्ताव स्थायी समितीसमोर येईपर्यंत या सभापतींची कारक ीर्द संपली तरीही या सभापतींनी आग्रह सोडला नाही.
‘कारभाºयां’चे त्यांना पाठबळ असल्याने नवीन सभापतींची निवड काही दिवस पुढे ढकलली. दरम्यानच्या काळात ‘चेअरमन फॉर द मिटिंग’चा आधार घेत त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. इतका सगळा प्रताप केल्यानंतर या सभापतींनी गेल्या नऊ महिने सातत्याने इमानेइतबारे संबंधित ठेकेदाराबरोबर पाठपुरावा केला.
या प्रकरणात तत्कालिन सभापती आणि कारभाºयांनी अडीच खोक्यांचा ढपला पाडल्याची चर्चा असली तर प्रत्यक्षात ८० पेट्यांचाच हा व्यवहार झाल्याचे सांगत सामान्य नगरीच्या सेवकांची फसगत केल्याचा आक्षेप घेतला जात आहे. पाण्यात ‘घाण’ केल्यावर कधी ना कधी वर येते, या निसर्गनियमाप्रमाणे या व्यवहारातील सत्य दोन दिवसांपासून बाहेर आले आहे.
त्यामुळे कारभाºयांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. नेहमीप्रमाणे याही वेळी कारभाºयांनी आपली फसवणूक केल्याची भावना नगरीच्या सेवकांची झाली आहे.
सोमवारी रात्री ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. त्याकडे दुर्लक्ष करत कधी पाणी मिळायचे ते मिळू दे, जलवाहिनी कधी टाकायच्या त्या टाकू देत आमचं आणि त्याच काही देणं-घेणं नाही, आमचा संबंध फक्त घेण्याशी आहे, बाकीचे अधिकारी बघून घेतील, अशा विचारांचे नगरीचे सेवक मंगळवारी महापालिकेकडे फिरकलेही नाहीत. विशेष म्हणजे या प्रकरणात पक्ष आघाडी यांचे राजकारण बाजूला ठेऊन सर्वजण एकत्र आल्याचेही चित्र पाहायला मिळाले.
धुसफूस नगरसेवकांत : ‘कारभारी’ मोकळेच
महापालिकेत एखादा फायद्याचा विषय असला की सर्व गट-तट, पक्ष विसरून सगळे एकत्र येतात. त्यावेळी आघाडीतील राजकारण विसरून जातात. काही ठरावीक ‘कारभारी’च त्यात लक्ष घालतात, तेच तडजोडी करतात. नगरीच्या सर्वसामान्य सेवकांना त्यातील काहीच कल्पना नसते. शेवटपर्यंत त्यांना काही कळू दिले जात नाही. ठरावीक आकड्यांची पाकिटे त्यांना दिली जातात. पुढे काही दिवसांनी त्या व्यवहारातील सत्य बाहेर पडते आणि आघाडीत धुसफूस सुरू होते. त्याचा राग सर्वसाधारण सभेत व्यक्त होतो. एकाच पक्षाचे दोन सेवक वेगवेगळी भूमिका घेतात आणि समोरच्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो; पण ‘कारभारी’ मात्र नामानिराळेच राहतात.

Web Title: Waterlogged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.