पाणीदार कोल्हापूर

By Admin | Published: April 30, 2016 12:06 AM2016-04-30T00:06:11+5:302016-04-30T00:42:10+5:30

नद्या : पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कडवी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, धामणी, दूधगंगा, वारणा, कुंभी, शाळी

Watery Kolhapur | पाणीदार कोल्हापूर

पाणीदार कोल्हापूर

googlenewsNext

निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे. शेतीसाठी सोडाच पिण्याचे पाणीही पंधरा दिवसांतून एकदा येते, अशी स्थिती अनेक शहरांत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची स्थिती पाहिली की, आपण नैसर्गिक साधनसंपत्तीने खरंच किती समृद्ध आहोत याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने राधानगरी धरण बांधले. त्यामुळेच या समृद्धीत भर पडली. आता एप्रिल संपून मे सुरू होत आहे आणि तुम्ही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात गेला तर तुडुंब भरलेल्या नद्या वाहताना दिसतात. रणरणत्या उन्हात या नद्या पाहूनच मनाला गारवा मिळतो. संपूर्ण महाराष्ट्रात असे चित्र कोल्हापूरवगळता अपवादानेच बघायला मिळेल. ‘लोकमत’ने गेल्या पंधरवड्यात तलावांनी कसा तळ गाठला याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यास वाचकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याच धर्तीवर भरलेल्या नद्यांचे हे दर्शन...समृद्धीचे दर्शन...पाणीदार जिल्ह्याचे दर्शन...कोल्हापूर हा जसा पाणीदार जिल्हा आहे, तसेच इथल्या मातीत आणि माणसांच्या अंगातही ईर्ष्येचे, स्वाभिमानाचे वेगळे पाणी आहे. कोल्हापूर म्हणूनही हे त्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.

नद्या : पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कडवी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, धामणी, दूधगंगा, वारणा, कुंभी, शाळी


बंधारे : राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, सांगली, अंकली, राजापूर.


मोठी धरणे : राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा.

मध्यम धरणे : कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे.

Web Title: Watery Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.