जुने पारगावची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:05+5:302021-06-22T04:17:05+5:30

नवे पारगाव : जुने पारगाव (ता. हातकणंगले) कोविड योद्ध्यांच्या सहकार्याने कोरोना दक्षता समितीने चांगले काम केले. गावात १४९ रुग्ण ...

On the way to Corona Liberation of Old Pargaon | जुने पारगावची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

जुने पारगावची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

googlenewsNext

नवे पारगाव : जुने पारगाव (ता. हातकणंगले) कोविड योद्ध्यांच्या सहकार्याने कोरोना दक्षता समितीने चांगले काम केले. गावात १४९ रुग्ण आढळले पैकी १४३ बरे झाले. पाचजणांचा मृत्यू झाला असून, आता फक्त एकच रुग्ण उपचाराखाली आहे. गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहाजीराव पाटील यांनी केली आहे.

जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथे कोरोना दक्षता समितीच्या आढावा बैठकीत शहाजीराव पाटील बोलत होते. सरपंच अरविंद पाटील अध्यक्षस्थानी होते.

पोलीस पाटील इंद्रजित पाटील म्हणाले, गावात कोरोना दर कमी करण्यासाठी कठोर निर्बंध सुरू ठेवले. वारंवार जंतुनाशक फवारणी केली. मास्क न वापरणारे २४, तर २ आस्थापनावर कारवाई करून ४९०० दंड वसूल केला.

यावेळी उपसरपंच शांता हजाम, डॉ. विवेकानंद डोईजड, तलाठी प्रधान भानसे, ग्रामविकास अधिकारी एम. आर. पाटील, श्रीकांत पाटील, पोपट इरकर, काजल भांडवले, सचिन मोरे, शिवकुमार माळी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

फोटो ओळी : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथे कोरोना दक्षता समितीच्या आढावा बैठकीत बोलताना शहाजीराव पाटील. सोबत सरपंच अरविंद पाटील, पोलीसपाटील इंद्रजित पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : दिलीप चरणे)

Web Title: On the way to Corona Liberation of Old Pargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.