आम्ही सारी माणसं आणि या सर्वांची माणुसकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:37+5:302021-04-26T04:22:37+5:30
जितेंद्र शिंदे, गरजूंना मोफत रिक्षासेवा पुरवितात टाकाळा येथील अनुकामिनी मंदिर परिसरात राहणारे जितेंद्र शिंदे हे गर्भवती महिला, दिव्यांग आणि ...
जितेंद्र शिंदे, गरजूंना मोफत रिक्षासेवा पुरवितात
टाकाळा येथील अनुकामिनी मंदिर परिसरात राहणारे जितेंद्र शिंदे हे गर्भवती महिला, दिव्यांग आणि कोरोनासह अन्य रुग्णांना मोफत रिक्षासेवा पुरवितात. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींच्या घरी ते औषधे, भाजीपाल पोहोचवितात. दिवसभर रिक्षा व्यवसाय करतात. त्यात गरजूंनी संपर्क साधला की, त्यांना मोफत सेवा पुरवितात. रोज शंभर रुपयांचे शिवभोजन घेऊन ते गरिबांना देतात. गेल्या वर्षभरापासून त्यांनी सुमारे १५ हजार जणांना सेवा पुरविली आहे. माझे आई-वडील वारल्यानंतर माझ्या मदतीला कोणी नव्हते. माझ्यासारखी वेळ कोणावर येऊ नये म्हणून गेल्या वर्षीपासून गरजूंची सेवा करत आहे. त्यातून वेगळे समाधान मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
फोटो (२५०४२०२१-कोल-जितेंद्र शिंदे (कोरोना मदत)
स्वप्निल पार्टे, जेवण, मास्क पुरवितात
मंगळवार पेठेतील स्वप्निल पार्टे हे गेल्यावर्षीच्या जनता कर्फ्यूपासून गरजूंना मदत करत आहेत. बंदोबस्ताला असलेले पोलीस, वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सामान्य नागरिकांना मास्क, सॅॅनिटायझर, फेसरूमाल, फेसशिल्ड, ग्लोज, टोपीचे वाटप केले आहे. पाणी, ताक, सरबत वाटप करतात. गरजूंना स्वत:च्या घरातून जेवण करून ते पुरवितात. गेल्या वर्षी जनता कर्फ्यूवेळी माझा मुलगा स्मित याने घरातून सरबत करून मिरजकर तिकटी येथील पोलिसांना दिले. त्याने केलेल्या या कृतीतून प्रेरणा घेऊन गरजूंच्या मदतीचे कार्य स्मित फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केले. ते अविरतपणे सुरू असल्याचे पार्टे यांनी सांगितले.
फोटो (२५०४२०२१-कोल-स्वप्निल पार्टे (कोरोना मदत) ०१ आणि ०२
===Photopath===
250421\25kol_3_25042021_5.jpg~250421\25kol_4_25042021_5.jpg
===Caption===
फोटो (२५०४२०२१-कोल-जितेंद्र शिंदे (कोरोना मदत)फोटो (२५०४२०२१-कोल-स्वप्नील पार्टे (कोरोना मदत) ०१ आणि ०२~फोटो (२५०४२०२१-कोल-जितेंद्र शिंदे (कोरोना मदत)फोटो (२५०४२०२१-कोल-स्वप्नील पार्टे (कोरोना मदत) ०१ आणि ०२