आम्ही सारी माणसं आणि या सर्वांची माणुसकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:39+5:302021-04-26T04:22:39+5:30
लक्ष्मीपुरीतील अमोल बुड्ढे हे वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून भटक्या जनावरांना आधार देत आहेत. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपासून त्यांनी ...
लक्ष्मीपुरीतील अमोल बुड्ढे हे वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून भटक्या जनावरांना आधार देत आहेत. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपासून त्यांनी हे कार्य सुरू केले आहे. त्यांच्या संस्थेतील विविध १५ जणांच्या मदतीने ते शहरातील विविध ६५ ठिकाणी भटके श्वान, मांजर, अशा जनावरांची त्यांचे खाद्य पुरवित आहेत. चपाती, बिस्किटे, मिक्स भात, आदी पुरवित आहेत. या उपक्रमात कौशिक मोदी, अक्षय कांबळे, विकास कोंडेकर, प्रसाद भोपळे, प्रमोद गुरव, शैलेश पोवार, सचिन पोवार, मल्हार जाधव योगदान देत आहेत. कोरोनाच्या संकटात बिथरलेल्या अवस्थेतील वन्य जीवांना देखील निसर्गाने जगण्याचा अधिकार दिला आहे. भूतदयेतून अशा वन्यजीवांना जीवदान देण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले असल्याचे बुड्ढे यांनी सांगितले.
फोटो (२५०४२०२१-कोल-अमोल बुड्ढे (कोरोना मदत) ०१ व ०२
ऐश्वर्या मुनिश्वर, गरजूंना भुकेचा घास देतात
कोल्हापुरातील ऐश्वर्या मुनिश्वर या सेवा निलयंम् या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना भुकेचा घास देण्याचे काम करीत आहेत. वीकेंड लॉकडाऊनची सुरुवात झाल्यापासून त्यांनी गरजू, गरिबांना जेवण पुरविणे सुरू केले. सध्या रोज दोनशे जणांना त्यांच्याकडून जेवण पुरविण्यात येत आहे. काहींना त्यांनी धान्याची किट दिली आहेत. संचारबंदीमुळे अनेकांना एक वेळचे जेवणही मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यांना जेवण पुरविण्याचे सेवा निलयंम्द्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही २० जण कार्यरत आहोत. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तीन महिने हा उपक्रम राबविला. सुमारे ३५० जणांना धान्याची किट दिली असल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले.
फोटो (२५०४२०२१-कोल-ऐश्वर्या मुनिश्वर (कोरोना मदत) ०१, ०२
संतोष कुकरेजा, तहान भागविण्याचे काम
गांधीनगर येथील व्यापारी संतोष कुकरेजा हे त्यांच्या अन्य १५ मित्रांच्या मदतीने संचारबंदीमध्ये रस्त्यांवर बंदोबस्ताला असणारे पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवा बजाविणारे कर्मचारी आणि गरिबांना पाणी, सरबत, ज्यूस, चहा, बिस्किट आणि गरजूंना जेवण वाटप करण्याचे काम करत आहेत. सांगली फाटा, गांधीनगर, तावडे हॉटेल, शिरोली जकात नाका, ताराराणी चौक, आदी परिसरात रोज त्यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.
फोटो (२५०४२०२१-कोल-संतोष कुकरेजा (कोरोना मदत)