सुनेकडे गाडी, पैसे मागण्याची आमची संस्कृती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:23+5:302021-09-13T04:24:23+5:30

कोल्हापूर : माझा मुलगा राजेशचे त्या मुलीशी लग्न होऊन पावणेपाच वर्षे झाली आहेत; पण ती आमच्याकडे सलग महिनाभरही कधीच ...

We don't have a culture of asking for money, cars | सुनेकडे गाडी, पैसे मागण्याची आमची संस्कृती नाही

सुनेकडे गाडी, पैसे मागण्याची आमची संस्कृती नाही

Next

कोल्हापूर : माझा मुलगा राजेशचे त्या मुलीशी लग्न होऊन पावणेपाच वर्षे झाली आहेत; पण ती आमच्याकडे सलग महिनाभरही कधीच राहिलेली नाही. गेली २ वर्षे ती कऱ्हाडलाच आहे. सुरुवातीला कौटुंबिक संबंधातून नंतर वकिलामार्फत त्यांनी सासरी यावे यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केले; पण त्या आल्या नाहीत. त्या येथे राहतच नसल्याने छळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आतापर्यंत इतक्या तरुणांना नोकऱ्या लावल्या; पण कुणाकडून अर्धा कप चहा घेतला नाही. त्यामुळे सुनेकडे गाडी आणि पैसे मागण्याचा प्रश्नच नाही, ती आमची संस्कृती नाही. त्यांनी असा आरोप करणे क्लेशदायक आहे. आता गुन्हा दाखल झाला आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: We don't have a culture of asking for money, cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.