जवानांच्या कुटुंबीयांसाठी सरसावली ‘वुई फॉर सोल्जर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:37+5:302020-12-06T04:24:37+5:30
डॉ. प्रकाश ओसवाल म्हणाले, स्वत: च्या जिवाची पर्वा न करता प्रतिकूल व खडतर परिस्थितीमध्ये सैनिक देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून ...
डॉ. प्रकाश ओसवाल म्हणाले, स्वत: च्या जिवाची पर्वा न करता प्रतिकूल व खडतर परिस्थितीमध्ये सैनिक देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून रक्षण करत असतात. आपण सारेजण त्यांच्यासोबत लढायला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे निदान त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपुलकी, आत्मीयता व प्रेमाची स्फूर्ती मिळावी म्हणून विविध उपक्रम घेण्यासाठी वुई फॉर सोल्जर्स फौडेशनची निर्मिती केली आहे. याचाच एक भाग म्हणून जवान व त्यांच्या कुटुंबीयांना अल्पदरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचबरोबर आरोग्य संदर्भातील ॲडव्हान्स तपासणीसाठी २० टक्के रक्कम देण्याची तरतूद केली आहे. या पत्रकार परिषदेला फौंडेशनचे दीपक गाडवे, मुकुंद कुलकर्णी, अनिल नागराळे, अमोल कोरगांवकर, विनयाक बर्वे, गजानन शिरोडकर, यशवंत व्हटकर, राजन शिंदे उपस्थित होते.
चौकट-
प्रायव्हेट हायस्कूलच्या दहावीतील १९७५ बॅचचे विद्यर्थी एकत्र येऊन या फौंडेशनची संकल्पना पुढे आणली. त्यांच्यासोबत सामाजिक काम करणारे काहीजण मदतीला आले आहेत. गेल्या वर्षभरासाठी त्यांच्याकडून जवान व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम घेतले आहे.